नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघास (रा. स्व. संघ) पथसंचनास राज्य सरकारला १६ नोव्हेंबरपर्यंत परवानगी द्यावीच लागेल, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला दिले आहेत. रा. स्व. संघाने तामिळनाडू राज्यातील विविध ठिकाणी पथसंचलन करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या सरकारने पथसंचलनास परवानगी नाकारली होती. त्यानंतर रा. स्व. संघाने उच्च न्यायालयात दाद मागितली होती, तेथे पथसंचलनास परवानगी मिळाली होती. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्या. दीपंकर दत्त यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रा. स्व. संघाच्या पथसंचलनात परवानगी द्यावीच लागेल, असे निर्देश स्टालिन सरकारला दिले आहेत. रा. स्व. संघाने आपल्या पथसंचलनासाठीचा प्रस्तावित मार्ग पुढील न दिवसात प्रशासनाकडे सोपवावा. त्यानंतर प्रशासनाने १६ नोव्हेंबरपर्यंत पथसंचलनास परवानगी द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.