पीएनबीची फेस्टिवल बोनान्झा ऑफर ‘ दिवाळी धमाका 2023 ’ जाहीर केली
ग्राहक आता किमान 8.40% दराने गृहकर्ज घेऊ शकतात
मुंबई: दिवाळीचा सण लक्षात घेऊन देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक, पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपली फेस्टिव्हल -बोनान्झा ऑफर 'दिवाळी धमाका 2023' जाहीर केली आहे. या विशेष ऑफरचा ग्राहक लाभ घेऊ शकतात गृह आणि कार कर्जावर अनुक्रमे 8.40% आणि 8.75% पासून सुरू होणाऱ्या कमी व्याजदरबरोबरच आगाऊ/प्रोसेसिंग शुल्क आणि गृह आणि कार कर्जाच्या सर्व प्रकारांवरील दस्तऐवजीकरण (अटी व शर्ती लागू)शुल्क पूर्ण माफ असेल.
अधिक तपशीलांसाठी, ग्राहक टोल-फ्री क्रमांक 1800 1800/1800 2021 किंवा पीएनबीच्या जवळच्या शाखेद्वारे बँकेशी संपर्क साधू शकतात. ग्राहक मोबाईल बँकिंग अँप पीएनबी वन वर लॉग इन करून किंवा https://www.pnbindia.in/ वर जाऊन माहिती मिळवू शकतात. गृहकर्ज सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही https://digihome.pnb.co.in/pnb/hl/ वर लॉग इन करू शकता.