आरा शेखने केली शिवलिंगाची विटंबना! मंदिरात शिरला अन्...

05 Nov 2023 16:26:18

Ara Sheikh


कोलकाता :
पश्चिम बंगालमधून एक विचित्र घटना पुढे आली आहे. येशील एका कट्टरपंथीयाने हिंदू मंदिरात जाऊन शिवलिंगासमोर लघूशंका केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच यावर सर्वत्र संतापही व्यक्त करण्यात येत आहे.
 
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मंदिरात शिरुन तिथे असलेल्या शिवलिंगासमोर लघुशंका करताना दिसत आहे. ही घटना पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील असून आरा शेख असे या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 
मंगळवार ३१ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आरा शेख याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Powered By Sangraha 9.0