कोकणात उच्च दर्जाच्या टिशूची निर्मिती होणार; 'एप्रिल एशिया कंपनी'ची १० हजार कोटींची गुंतवणूक

04 Nov 2023 17:16:54
April Asia Company 10 Thousand Crore Investment in Kokan

मुंबई :
राज्य सरकारकडून महाराष्ट्रात मोठमोठ्या उद्योगांची निर्मिती करण्यात येत असून कोकणात उच्च दर्जाच्या टिशूची निर्मिती केली जाणार आहे. राज्य सरकारकडून तब्बल १० हजार कोटींचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या उद्योगामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, सरकारकडून राज्यात नवनवीन उद्योग सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली जात असून या प्रकल्पाच्या माध्यमातून एप्रिल एशिया कंपनी गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे कोकणात १० हजार कोटींची मोठी गुंतवणूक येत असून महाराष्ट्रातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
Powered By Sangraha 9.0