काँग्रेसला दणका देत राजस्थानमध्ये भाजपच कमळ फुलणार?

30 Nov 2023 19:34:11
 
rajasthan
मागच्या दोन महिन्यांपासून मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा आणि मिजोराम राज्यांच्या विधानसभा निवडणूकीची चर्चा सुरु होती. आज शेवटच्या टप्यात तेलंगणा राज्यात ५ वाजेपर्यंत मतदान पार पडले. यानंतर लगेच सर्वच वृत्तवाहिन्यांवर एक्झीट पोलची चर्चा सुरु झाली. पाच राज्यातील विधानसभा निवडणूक म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीआधीची रंगीत तालिम आहे.
 
 या पाच राज्यांमधील सर्वात मोठे आणि महत्वाचे राज्य आहे, राजस्थान. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार आहे. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदल होण्याची परंपरा आहे. त्यामुळे भाजपला येथे सत्ता मिळवण्याची आशा आहे. तर राजकारणात जादूगर अशी ओळख असलेल्या अशोक गेहलोत यांनी सुद्धा ही परंपरा तुटेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
 
राजस्थानमध्ये निवडणूकींच्या मुद्यांचा विचार केल्यास, महिला सुरक्षा, कन्हेयालाल हत्या प्रकरण, भरती घोटाळा, काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी यांचा समावेश आहे. त्यासोबतच अशोक गेहलोत यांनी वाटलेल्या फ्री बीज मुळे राजस्थानमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे, असा अंदाज एक्झीट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सुद्धा अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. तरीही सर्व एक्झीट पोलचा सार काढल्यास राजस्थानमध्ये सत्ता बदल होण्याची शक्यता आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0