कोल्हापुर: कोल्हापुरचे मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी शरद पवारांनवर मराठ्यांच्या जमिनी लाटून गुजराती मारवाड्यांना दिल्या असा गंभीर आरोप केलाय. शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे कांतीलाल चोरडीया यांच्यावर कोल्हापुर मधील ६० कोटींची जमीन हडपल्याचा आरोप केला गेलाय. कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस ठाण्यात कांतीलाल चोरडीया यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय.
“कांतीलाल चोरडीयांचे गॉडफादर शरद पवार साहेब जे जाणते राजे म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठी माणसावर अन्याय केलेला आहे आणि चिंचलीकर परिवाराला १ रुपया ही न देता परप्रांतीयांसाठी ६० कोटींची जमीन लाटलेली आहे.” अस दिलीप पाटील यांनी म्हटल आहे.
कोल्हापुरच्या बसस्थानकाजवळील पंचशील हॉटेल शेजारी ही साधारण २० गुंठे जागा आहे. रासोजीराव जाधव चिंचलीकर यांच्या मालकीची ही जागा फसवणुक करुन कांतीलाल चोरडीया यांच्या मदतीने शरद पवार यांनी बळकावल्याचा आरोप दिलीप पाटील यांनी केला आहे.