कोरोनानंतर चीनवर आणखी एका महामारीचे सावट! हजारों नागरिकांना झाली लागण

25 Nov 2023 15:26:22

China


मुंबई :
चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूमुळे संपुर्ण जग हादरल्यानंतर आता तिथे न्यूमोनिया आजार पसरला असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनमध्ये H9N2 प्रकारातील न्यूमोनिया विषाणू पसरल्याची माहिती मिळताच सगळीकडे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये न्युमोनियाचे २४ तासांत १३ हजार संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच तिथली परिस्थिती अजूनही चिंताजनक असून एक दिवसात ७ हजार रुग्ण सापडत आहेत. तेथील रुग्णालयांमध्ये न्युमोनियाने ग्रस्त असलेल्या मुलांची संख्या वाढत आहे.
 
दरम्यान, चीनमधील परिस्थिती पाहता डॉक्टरांनी भारताला सतर्कता बाळगण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या विषयावर एक बैठक घेतली असून या आजाराचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याचे म्हटले आहे. तसेच उत्तर चीनमधील मुलांमध्ये आढळणारी H9N2 ची प्रकरणे आणि श्वससंबंधी आजारांच्या प्रसारावर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे, असेही सांगण्यात आले आहे.
 
याशिवाय सध्याच्या परिस्थितीत उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे. दुसरीकडे, चीनमध्ये पसरलेल्या या आजाराने जागतिक आरोग्य संघटनेचीही (WHO) चिंता वाढवली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने १३ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत या आजाराची माहिती दिली होती.


Powered By Sangraha 9.0