रसिका शिंदे-पॉल
सिने - भारत
आठवड्याच्या दर शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची माहिती आम्ही तुमच्यासाठी सिने-भारत मधून देणार आहोत. कुटुंबासोबत आणि मित्रांसह चित्रपटगृहात जाऊन चित्रपटांचा मनमुराद आनंद घ्या...
झिम्मा २
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' चित्रपट प्रदर्शित झाला असून २०२१ साली प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा १' मधील प्रत्येक पात्राचा पुढचा प्रवास 'झिम्मा २' मध्ये उलगडणार आहे. पुन्हा एकदा ७ बायका नव्या ट्रीपला जाणार असून नवी धमाल मस्ती आणि काही गोष्टी नव्याने सगळ्यांना समजणार आहेत. महत्वाचे म्हणजे 'झिम्मा'च्या ताफ्यात नव्या दोन बायका आल्या असून त्या किती रंगत आणणार हे चित्रपट पाहिल्यावरच तुम्हाला कळणार आहे.
प्रदर्शित
कलाकार - सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरु
इमर्जन्सी
अभिनेत्री कंगना राणावत दिग्दर्शित आणि निर्मित 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात स्वत: कंगनाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. १९७५ साली इंदिरा गांधी यांनी भारतात लागू केलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीवर चित्रपटाचे कथानक आधारित आहे.
प्रदर्शित
कलाकार - कंगना राणावत, मिलिंद सोमण, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी
फर्रे
शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित 'फर्रे' या चित्रपटाचे कथानक परीक्षेत फसवणूक करत त्यानंतर येणाऱ्या अडचणींवर आधारित आहे. तसेच, या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सलमान खान याची भाची अलिजेह अग्निहोत्री हिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
प्रदर्शित
कलाकार - अलिजेह अग्निहोत्री, साहिल मेहता, जुही बाबर