हवामान बदलावर मुंबईत कार्यशाळा

24 Nov 2023 15:25:33


AKAH group photo


मुंबई (विशेष प्रतिनिधी): बदलत्या वातावरणीय आणि हवामानबदलासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातुन 'आगा खान एजंसी फॉर हॅबिटॅट' या संस्थेने मुंबईतील वांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये कार्यशाळा आयोजित केलीहोती. बुधवार दि. २२ नोव्हेंबर रोजी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असुन याला कॉर्पोरेट क्षेत्रातील तर सरकारी स्तरावरील काही अधिकारी ही उपस्थीत होते.

हवामान आणि वातावरण बदल या विषयावर भारतासहीत अनेक देश जागरुक झाले असुन याविषयी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केले जात आहे. पर्यावरणासाठी कामकरणाऱ्या 'आगा खान एजंसी फॉर हॅबिटॅट' यासंस्थेने क्लायमेट अॅक्शन: टुवर्ड्स नेट झिरो- बिल्डींग क्लायमेट रेझिलियंस यानावाने कार्यशाळांच्या मालिकेचे आयोजन केले आहे. या मालिके अंतर्गत पहिली कार्यशाळा बांद्रे येथील ताज हॉटेलमध्ये पार पडली असुन, “वातावरण बदल ही अफवा नसुन सत्य आहे आणि ते मान्य करूनजागरुकपणे त्यावर काम करायला हवे”असा सुर या कार्यशाळेमधून ऐकायला मिळाला.सुरुवातीला 'आगा खान एजंसी फॉर हॅबिटॅट'चे ग्लोबल हेड ओनो ऱ्हूल आणि गोविंदराज एथिराज यांच्यामध्ये संवाद सत्र झाले.यामध्ये ३ पॅनल्सची ३ विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती.

पहिल्या चर्चासत्रात हवामानाशी सुसंगत राहण्यायोग्य शहरांची निर्मिती (Building Climate Resilient Livable Cities) या विषयावर इन्फोसिसचे संचालक (Infosys) स्वप्निल जोशी यांनीमहाराष्ट्र शासनाच्या हवामान कृती सेलचे संचालक अभिजीत घोरपडे, दक्षिण आशिया आएफसी (IFC) वर्ल्ड बँक ग्रुपचे ऑतिफ सय्यद, ICLEI चे प्रकल्प समन्वयक निखील कोळसेपाटीलआणि आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक डॉ. रवी सिन्हा यांच्याशी संवाद झाला. महाराष्ट्र शासनाच्या क्लायमेट अॅक्सलरेशन प्लॅनबद्दल अभिजीत घोरपडे यांनी सांगितले. वातावरण आणि हवामान बदलाच्या ५०% अडचणी आज विकसीत असलेले तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तोडगा काढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.

दुसऱ्या चर्चासत्रात किनाऱ्यांवरील हवामानाशी जुळवून घेण्यासाठीचे पर्यावरणपुरक उपाय या विषयावर अर्था ग्लोबलचे जगन शाह यांनी महाराष्ट्र कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही.रामाराव, द नेचर कॉन्झरवन्सीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ.अन्नपुर्णा वंचेस्वरन आणि प्लुरलच्या संस्थापक सदस्य जास्मीन सलुजा यांच्याशी संवाद साधला. किनाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि कार्बनशोषक म्हणुन कांदळवने कशी महत्त्वाची आहेत याबाबत कांदळवन कक्षाचे एस. व्ही.रामाराव यांनी आपले मते मांडली.

तिसऱ्या आणि वातावरण बदल कार्यशाळेतील शेवटच्या चर्चासत्रात नेटझिरोच्या दिशेने वाटचाल आणि कार्बन शोषणाचे भविष्य या विषयावर क्लिन एअर एशिया आणि कार्बन डिसक्लोजर प्रोजेक्टच्या माजी राष्ट्रीय संचालिका प्रार्थना बोरा यांनी LTIMindtree कंपनीचे प्रत्युषपांडा, जेएसडब्लू ग्रुपचे प्रबोध आचार्य आणि सस्टेनेबिलिटी एचएसबीसी (Sustanability HSBC) चे वरिष्ठ उपाध्यक्ष रोमित सेन यांच्याशी संवाद साधला.

एकंदरच किनाऱ्यांचे संवर्धन, निसर्गाशी समन्वयसाधून वसवलेली शहरे आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीकोनातुन कोणत्या कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याविषयी चर्चा झाली. अशाच प्रकारच्या कार्यशाळा आगा खान ही संस्था अनेक शहरांत घेणार असुन हवामान बदलाविषयी जगजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.


prerana langa





Powered By Sangraha 9.0