३१ डिसेंबरनंतर सरकार घरी बसणार! आदित्य ठाकरेंचा दावा
23 Nov 2023 14:09:58
मुंबई : गुरुवारपासून आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्याला सुरुवात झाली असून ते सावंतवाडी इथे दाखल झाले आहेत. या दोऱ्यामध्ये ते खळा बैठक घेणार आहेत. यावेळी ते काही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
खळा बैठकीतून ग्रामस्थांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले. तसेच पदवीधर निवडणुकांची तयारी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांना आमदार अपात्रतेच्या सुनावणीबद्दल विचारले असता ते म्हणाले की. ३१ तारखेच्या आधी निकाल येणं गरजेचं आहे.
तसेच ३१ डिसेंबरला हे सरकार पडणार असून २०२४ ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्ष चोरणाऱ्या लोकांना ३१ तारखेनंतर घरी बसावंच लागेल असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.