प्रिया बापट नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दिसणार मुख्य भूमिकेत

21 Nov 2023 18:04:11

priya bapat 
 
मुंबई : मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतून थेट हिंदी मनोरंजनसृष्टीत आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट पुन्हा एकदा नव्या भूमिकेत दिसणार आहे. यावेळी चक्क ती अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या सोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ९० च्या दशकातील एका थ्रिलर चित्रपटात प्रिया महत्वपुर्ण भूमिका साकारणार आहे.
 
इतक्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव व्यक्त करताना प्रिया बापट म्हणते, "ज्या दिवसापासून मी चित्रपटाची कथा ऐकली, त्या दिवसापासून मी या मनोरंजक थ्रिलरचा एक भाग होण्यासाठी आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्यास उत्सुक होते. ९० च्या दशकात काम करण्याची संधी मिळाली आहे याचा आनंद आहे. तसेच, नवाझुद्दीनसोबत काम करणे म्हणजे दररोज काहीतरी नवीन शिकण्यासारखे आहे”.
 

priya bapat 
 
९० च्या दशकातील काळ पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी दिग्दर्शक सेजल शाह देणार असून या चित्रपटाची निर्मिती विनोद भानूशाली यांनी केली आहे. प्रियाने यापुर्वी सिटी ऑफ ड्रीम्स, आणि रफुचक्कर यात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. आता नवाजुद्दीनसोबत नव्या भूमिकेसाठी ती सज्ज झाली आहे. 
Powered By Sangraha 9.0