भारतीय विमानतळ प्राधिकरणात अॅप्रेंटिस म्हणून काम करण्याची संधी

21 Nov 2023 18:17:41
Airports Authority of India Recruitment 2023

मुंबई :
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत अॅप्रेंटिसशीप पदासाठी अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत १८५ रिक्त जागांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणातील रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ डिसेंबर २०२३ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 
भारतीय विमानतळ प्राधिकरणातील अॅप्रेंटिसशीप पदांसाठी विविध रिक्त जागांसाठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. डिप्लोमाधारक किंवा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर या भरतीकरिता अप्लाय करू शकतात. भरतीसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Powered By Sangraha 9.0