सख्ख्या भावांची दाखल्यावर वेगवेगळी जात!

02 Nov 2023 17:49:45
 
Kunbi
 
 
पुणे : आंबेगाव तालुक्यातील सख्ख्या दिवंगत भावांच्या वेगवेगळ्या जाती असल्याची माहिती समोर आली आहे. एका भावाची मराठा तर दुसऱ्या भावाची कुणबी अशी जात शाळेच्या दाखल्यांवर नोंदवण्यात आलेली आहे. शाळेच्या दाखल्यांवर जना आंबटकर या मोठ्या भावाची कुणबी तर सुदाम आंबटकर या लहानग्या भावाची मराठा जात नोंदवण्यात आलेली आहे. सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा समावेश ओबीसीत करण्याची मागणी केली जात असताना मराठा आणि कुणबी हे एकच आहेत.
 
यासंदर्भातील अनेक पुरावे शिंदे समितीला मिळाले आहे. मात्र या कुणबीमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे समोर आलं आहे.
सख्ख्या भावांच्या दाखल्यावर वेगवेगळ्या नोंदी असल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर असे अनेक प्रकार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या शिंदे समितीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आंबेगाव तालुक्यातील फक्त एका गावातच 1120 नोंदी आढळल्या आहेत. शाळेकडून सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. जना कृष्णाजी आंबटकर यांच्या दाखल्यावर कुणबी आणि त्यांचा भाऊ सुदाम कृष्णाजी आंबटकर यांच्या दाखल्यावर हिंदू मराठा अशी नोंद आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0