गांधीनगर : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मैदानात रविवारी दि. १९ नोव्हेंबर २ वाजता सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिली विकेट गमावली आहे. शुभमन गिल अवघ्या ४ धावा करुन बाद झाला. त्याची विकेट मिचेल स्टॉर्कने घेतली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आपल्या आक्रमक अंदाजात फलंदाजी करत आहे. रोहितने २० चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने दोन षटकार मारले आहेत.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच भारतीय हवाई दलाने सुद्धा रोहितसेनेच्या उत्साह वाढवण्यासाठी स्टेडियमवर हवाई प्रात्यक्षिक दाखवले. भारतीय हवाई दलाने संपूर्ण जगाला आपल्या ताकद दाखवली. हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, सर्व एकदिवसीय विश्वचषक विजेते कर्णधार सुद्धा हा सामना पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदी आंतराष्ट्रीय स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान आहे. या मैदानात १ लाख ३० हजार प्रेक्षक एकाचवेळी सामना पाहू शकतात. स्टेडियममधील बहुतांश प्रेक्षक हे भारतीय संघाचे चाहते असतील. देशभरात भारतीय संघाच्या विजयासाठी पूजापाठ चालू आहे.