अभिनेत्री ते उद्योजिका कतरिना कैफने गाठला मोठा पल्ला!

18 Nov 2023 16:36:55

katrina kaif 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत अल्पावधितच आपली जागा निर्माण करणारी अभिनेत्री कतरिना कैफ अभिनयासोबत आघाडीची उद्योजिका म्हणून नावलौकिक मिळवत आहे. कतरिना कैफच्या सौंदर्यावर तिचे चाहते भाळतातच. तर अशाच एका सौंदर्याच्या ब्रॅण्डची कतरिना मालकीण आहे. कतरिना के ब्युटीया तिच्या सौंदर्यप्रसाधन ब्रॅण्डची उद्योजिका असून नुकताच तिने तिच्या उद्योजिकेच्या प्रवासाबद्दल एका कार्यक्रमात खास गोष्ट सांगितली.
 
“अभिनेत्री म्हणून काम करत असताना व्यवसाय करणं हे नक्कीच आव्हानात्मक होतं. मात्र, व्यावसायिकेची भूमिका बजावून लोकांच्या पसंतीस के ब्युटी ब्रँड येणं हा प्रवास माझ्यासाठी खास होता. २०१९ मध्ये ‘के ब्युटी’चा प्रवास सुरू झाला. गेल्या चार वर्षांपासून उत्तम पणे कार्यरत असलेला ब्रँड आहे याचा मला खूप अभिमान आहे", असे कतरिना म्हणाली.
 
कतरिना कैफ हिने आपल्या अभिनयाची सुरुवात २००३ आलेल्या बुम या चित्रपटातून केली. त्यानंतर ‘मैने प्यार क्यु किया’, ‘नमस्ते लंडन’, ‘हमको दिवाना कर गये’, ‘रेस’, ‘अपने’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘टायगर ३’, ‘धुम ३’ अशा चित्रपटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.
Powered By Sangraha 9.0