पावरप्लेमध्ये भारताची जोरदार फटकेबाजी! भारत १ बाद ८४ धावा

15 Nov 2023 14:51:19
Ind vs nz Semi final Match icc world cup

मुंबई :
भारत विरुध्द न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विश्चचषकाच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना खेळविण्यात येत आहे. भारताने पहिल्या पावरप्लेपर्यंत १ बाद ८४ धावा केल्या आहेत. शुभमन गिल २६ चेंडूंत ४ चौकारांसह ३० धावा करून खेळत आहे. तर कर्णधार रोहित शर्मा विस्फोटक फलंदाजी करूनु ४७ धावांवर बाद झाला. 

या सामन्यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकत सर्वप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्म आणि सलामीवीर शुभमन गिल या जोडीने भारताला पहिल्या पावरप्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेट्ससाठी ७१ धावांची महत्तवपूर्ण भागीदारी झाली. दरम्यान, कर्णधार रोहित शर्मा टिम साऊदीच्या गोलंदाजीवर विलियमसन करवी झेलबाद झाला. यावेळी रोहित २९ चेंडूंत ४७ धावांवर खेळत होता.
Powered By Sangraha 9.0