छटपूजेसाठी योग्य त्या सोईसुविधा द्या : मंत्री मंगलप्रभात लोढा

15 Nov 2023 18:47:46
Cabinet MInister Mangal Prabhat Lodha on Chhatha Puja

मुंबई :
छटपूजा उत्सव जवळ आला आहे. यानिमित्ताने मुंबईतील सुमारे ८२ छटपूजा स्थळांवर भाविकांसाठी आवश्यक त्या नागरी सेवा-सुविधा पुरविण्याचे निर्देश राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.

त्यानुसार, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संंधित विभाग कार्यालयांनी योग्य ती कामे हाती घेतली आहेत, अशी माहिती (परिमंडळ-२)चे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.

छटपूजेसाठी करण्यात येणार्‍या उपाययोजना

- मुंबईमधील एकूण ८२ छटपूजा स्थळी महानगरपालिकेतर्फे विदयुत व प्रकाश व्यवस्था, साफसफाई व स्वच्छता व्यवस्था, धुम्रफवारणी आदीची सोय

- पूजेच्या कालावधीच्या दोन दिवस पूर्वीपासून स्वच्छतेचे काम

- आवश्यक असेल त्या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मीती

- वैदयकीय सुविधा तसेच रुग्णवाहिकेची व्यवस्था

- कृत्रिम तलाव व नैसर्गिक विसर्जन स्थळी आरती व पूजेकरीता टेबलची व्यवस्था

- शौचालयाची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, निर्माल्य कलश/ निर्माल्य वाहन याची व्यवस्था आदी
Powered By Sangraha 9.0