नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये परालीद्वारे होणाऱ्या वायु प्रदूषणाच्या तुलनेत फटक्यांनी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण नगण्य असल्याचे वायु गुणवत्ता निर्देशांकात (एक्युआय) स्पष्ट झाले आहे.
दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरात (एनसीआर) दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले. सायंकाळी सात वाजेनंतर लक्ष्मीपुजनानंतर साधारणपणे मध्यरात्रीपर्यंत नागरिकांनी फटाके फोडून दिवाळी साजरी केली. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांकडे यावेळी नागरिकांनी सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.
मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यानंतरही एक्युआयमध्ये फार वाढ झाल्याचे दिसले नाही. दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे ११ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडीअम, नेहरू नगर, वसुंधरा, आनंद विहार येथे अनुक्रमे २४६, २५८, १८६, २९६ असा एक्युआय होता. त्यानंतर सोमवारी महणजे १३ नोव्हेंबर रोजी याच भागांमधील एक्युआय अनुक्रमे २१४, २४२, १९६ आणि ३१२ असा असल्याचे दिसले. त्यामुळे दिल्लीत केवळ फटाक्यांमुळेच वायु प्रदूषण होतो, या अपप्रचाराचा बुरखा फाटला आहे.