नवी दिल्ली : पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला असून बाबरसेनेचे या विश्वचषकात नवनवे ड्रामा समोर आले आहेत. दरम्यान, पाकिस्तान संघाला इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात विजय मिळविता आला असता तर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असता. परंतु, या सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने बाबरसेनेचे आव्हान संपुष्टात आले. दरम्यान, आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाबरसेना पुढील १ वर्ष एकही एकदिवसीय सामना खेळणार नाही, कारण त्यांचा पुढील एकदिवसीय सामना नोव्हेंबर २०२४ मध्ये खेळविण्यात येणार आहे.
दरम्यान, पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानच्या ड्रामामुळे पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या संघाच्या ताज्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानच्या बाद झाल्याबद्दल खूप विनोद झाले. क्लीन बोल्ड झाल्यानंतर तो जमिनीवर पडला. त्याला 'क्रॅम्प्स' असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तो नाटक करत असल्याचे लोकांनी सोशल मीडियावर बोलले जात आहे.
तसेच, मोहम्मद रिझवानने या सामन्यात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान नमाजही अदा केल्याचे पाहायला मिळाले. तर पाकिस्तान संघाचा मध्यम गती गोलंदाज हॅरिस रौफ हा कोणत्याही विश्वचषकात सर्वाधिक धावा आणि षटकार ठोकणारा गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे नमाज पढली, क्रॅम्प्स आले आणि खाली पडलो अशा प्रकारच्या मोहम्मद रिझवानच्या ड्रामामुळे पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर तर हॅरिस रौफने सर्वाधिक षटकार पडणारा गोलंदाज म्हणून विक्रम केला.
पाकिस्तान पुढील १ वर्ष एकही एकदिवसीय सामना खेळणार नाही, कारण त्याचा पुढील एकदिवसीय सामना नोव्हेंबर 2024 मध्ये आहे. ताज्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानच्या बाद झाल्याबद्दल खूप विनोद झाले. क्लीन बोल्ड झाल्यानंतर तो जमिनीवर पडला. त्याला 'क्रॅम्प्स' असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तो नाटक करत असल्याचे लोकांनी सोशल मीडियावर सांगितले.
इंग्लंडविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तान क्रिकेट संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधून बाहेर पडला आहे. मात्र, विजय-पराजयाचा निर्णय होण्याआधीच पाकिस्तान उपांत्य फेरीत जाणार नाही हे निश्चित होते, कारण त्यांना इंग्लंडच्या धावसंख्येचा पाठलाग अवघ्या ६.२ षटकांत करायचा होता, जो अशक्य होता. इंग्लंडने पाकिस्तानचा ९३ धावांनी पराभव केला. पाकिस्तानकडून केवळ एक फलंदाज आघा सलमान अर्धशतक करू शकला. इंग्लंडच्या ३३७ धावांच्या प्रत्युत्तरात संघ अवघ्या २४४ धावांत गडगडला.