"तालिबानवर एकच उपाय आहे, तो म्हणजे बजरंग बलीची गदा." - योगी आदित्यनाथ

    01-Nov-2023
Total Views |
 yogi Aadiyanath
 
जयपूर : "तालिबानच्या मानसिकतेवर एकच उपाय आहे, तो म्हणजे बजरंग बलीची गदा." असे विधान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इस्रायलच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईचे कौतुक करताना केले आहे. राजस्थानमधील तिजारा जिल्ह्यात एका सभेत बोलत होते.
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इस्रायलचे कौतुक केले. गाझामधील तालिबानी मानसिकतेला इस्रायल कशा प्रकारे चिरडत आहे, हे आपण पाहत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सुद्धा निशाना साधला आहे. यावेळी सुद्धा त्यांनी इस्रायल-हमासच्या युद्धाचा उल्लेख केला. .
 
काँग्रेसवर दहशतवादाचे समर्थक असल्याचा आरोप करत योगी म्हणाले की, "सरदार पटेल यांनी काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवले, मात्र काँग्रेस नेते जवाहरलाल नेहरू यांनी येथेही समस्या निर्माण केल्या, त्यामुळे दहशतवाद पसरला."
 
काश्मीरमधून दहशतवाद संपवण्याचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना दिले. ते म्हणाले की, "भाजपचे सरकार आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरला दहशतवादाच्या समस्येपासून मुक्ती दिली.