गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तीन मराठी चित्रपटांची निवड; मंत्री मुनगंटीवार यांची घोषणा

01 Nov 2023 22:33:34
3 Marathi Flims in Goa International Film Festival

मुंबई :
यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी चित्रपटांची निवड केली असल्याची घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या तीनही चित्रपटांच्या चमूचे मंत्री मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

दरवर्षी गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'फिल्म बाझार' या गटात मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. या चित्रपटांची निवड करण्याकरता पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसीनुसार ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय हे तीन चित्रपट निवडण्यात आले आहेत. या तीनही चित्रपटाचा प्रत्येकी एक प्रतिनिधी शासनातर्फे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याकरता चित्रपटांसोबत पाठविण्यात येणार आहे.
 
शासनाने दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून जाहिरातीद्वारे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'फिल्म बाजार' या विभागात राज्य सरकारकडून पाठविण्याकरता इच्छुक चित्रपटांची आवेदने मागवली होती. त्यानुसार एकूण २९ चित्रपटांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. रेणुका शहाणे-वीज, प्रसाद नामजोशी, हर्षित अभिराज, समीर आठल्ये आणि संदीप पाटील यांच्या समितीने परीक्षणाअंती त्यापैकी ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन चित्रपटांची निवड केली.
 
Powered By Sangraha 9.0