World Cup 2023 : किवींचे नेदरलँड्सला ३२३ धावांचे आव्हान

09 Oct 2023 18:38:48
New Zealand Vs Netherlans Match In Hyderabad

मुंबई :
आयसीसी विश्चचषक २०२३ मधील न्यूजीलंडचा दुसरा सामना नेदरलँड्सशी हैदराबाद येथे खेळविला जात आहे. नेदरलँड्सने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिली गोलंदाजी करताना न्यूजीलँडच्या संघाला ७ बाद ३२२ धावांवर रोखता आले. नेदरलँड्सकडून गोलंदाजी करताना सर्वाधिक विकेट्स आर्यन दत्त, मिकरेन आणि मेर्व यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

न्यूजीलंडकडून सलामीवीर कॉनवे आणि विल यंग या जोडीने ६१ धावांची भागादारी करत चांगली सुरुवात संघाला करून दिली. तसेच, किवींचा मिडल ऑर्डरने चांगला खेळ करत संघाला एक चांगली धावसंख्या गाठण्यासाठी मदत केली. कप्तान लॅथमने ४६ चेंडूत ५३ धावा तर डरेल मिचेल याने ४६ चेंडूत ४८ धावा केल्या.  बलाढ्य संघाचे आव्हान मोडीत काढण्यात नेदरलँड्स संघ यशस्वी होतो का, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलेले असेल.



Powered By Sangraha 9.0