"ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टंट इंडिया लिमिटेड" अंतर्गत विविध पदांसाठी भरती!

09 Oct 2023 16:16:48
Broadcast Engineering Consultant India Limited

मुंबई : "ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड" अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीची मिळणार आहे. तसेच, या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण १२९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा असून याकरिता अंतिम मुदत दि. १९ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.

या भरतीद्वारे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, वॉर्ड अटेंडंट, रेडिओलॉजी टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, गार्डनर, एमटीएस, ड्रायव्हर, योगा थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेशन, आयटी असिस्टंट, पंचकर्म बायो अटेंडंट, लॅब अटेंडंट वैद्यकीय अभियंता, जनसंपर्क अधिकारी (पीआरओ), डीनचे वैयक्तिक सचिव, सहायक ग्रंथालय अधिकारी, संग्रहालय कीपर, ऑप्टोमेट्रिस्ट या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.


Powered By Sangraha 9.0