मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी सुरु आहे. अजित पवार गटाचे वकील नीरज किशोर कौल यांच्याकडून सुरुवात करण्यात आली. एकच व्यक्ती पक्षातील सर्व गोष्टी ठरवू शकत नाही, असं अजितदादा गटाने म्हटलं आहे. तर, विधीमंडळातील बहुमत आमच्याकडे आहे. त्याचा विचार करुनच निर्णय घ्यावा लागेल. राज्य आणि देशातील पदाधिकारी आमच्यासोबत आहेत, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला.
अजित पवार गटाकडून शिवसेना आणि सादिक अली प्रकरणाचा दाखला देण्यात आला आहे. शरद पवारांनी आपलं घर चालवलं तसाच पक्ष चालवला. मनी सर्व नियम पायदळी तुडवले, असा दावा अजित पवार गटाने केला. पक्षाची घटना आणि कायद्यानुसार निर्णय झाला नाही. पक्षाची घटना आणि घेतलेले निर्णय यात तफावत आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाने केला. यावेळी अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी पक्षाची घटना वाचवून दाखवली.