रोहित पवारांनी केली पदयात्रेची घोषणा! पुण्यातून करणार सुरुवात

05 Oct 2023 18:11:47

Rohit Pawar 
 
 
मुंबई : आमदार रोहित पवार २४ ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहे. ही यात्रा ८२० किलोमीटर ची पदयात्रा असणार आहे.आणि दसऱ्याच्या दिवशी पुण्यातून ही यात्रा सुरू होणार आहे.आणि नागपूरला याची सांगता होईल. पुण्यातील महात्मा फुले वाडा येथून या यात्रेला सुरवात होणार आहे.त्यांनतर वढू तुळापूर येथे नतमस्तक होऊन, खऱ्या अर्थाने यात्रेचा शुभारंभ होईल. संतांच्या, महाराजांच्या भूमीतून यात्रा जाईल. १३ जिल्ह्यातून यात्रेचा प्रवास होईल.आणि दरोरोज कमीत कमी १६ आणि जास्तीत जास्त २५ किमी असा पायी प्रवास असणार आहे.
 
रोहित पवार म्हणाले की, "आज युवा म्हणून संवाद साधत आहे. ज्या दिवसापासून राजकारणात आलो, तेंव्हापासून युवांचे प्रश्न मांडणे अन त्यांच्या अडचणी सोडवण्याचे मी प्रयत्न करत आलो आहे. मतदारसंघाप्रमाणेच मी युवांच्या प्रश्नांना ही प्राधान्य मांडले आहे. शिक्षण, बेरोजगारी, संघटित-असंघटित क्षेत्राचे प्रश्न मी मांडलेले आहेत. पण आजच्या राजकारणाची परिस्थिती पाहता युवा नेत्यांनी राजकारणात आलो ही चूक झाली का? किंवा नव्या पिढीने राजकारणात यावं की नाही? युवा पिढी प्रमाणेच मला ही हेच प्रश्न पडले होते. पण घरी बसून राहायचं नसून याविरोधात आम्ही लढा सुरू केला." असं त्यांनी सांगितलं.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0