बालकांच्या मृत्यूला खाजगी दवाखाने जबाबदार! नांदेड मृत्यूप्रकरणी सरकार उत्तर दाखल करणार

05 Oct 2023 13:18:02

Hospital


नांदेड :
नांदेड दुर्घटनेचे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात गेले असून शुक्रवारी राज्य सरकारकडून याबाबत उत्तर दाखल करण्यात येणार आहे. यावेळी नेमके कशामुळे मृत्यू झाले याबाबतची माहिती राज्य सरकाकडून देण्यात येणार आहे.
 
नांदेडमधील शासकीय रुग्णालयात ४८ तासांत ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. न्यायालयाने राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.
 
या दुर्घटनेप्रकरणी आता राज्य सरकार शुक्रवारी हायकोर्टात उत्तर दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, लहान मुलांच्या मृत्यूला खाजगी दवाखाने जबाबदार असल्याचे या उत्तरात सांगण्यात येणार आहे. दवाखान्यांनी मुलांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. राज्य सरकारकडून नेमके कशामुळे मृत्यू झाले याबाबतची माहिती दिली जाणार आहे.


Powered By Sangraha 9.0