मुंबई : महाजेनको अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाजेनकोकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून "महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड" अंतर्गत रिक्त पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाजेनकोद्वारे "महाव्यवस्थापक (सुरक्षा)" या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदाची एकूण "०१" रिक्त जागा भरली जाणार आहे. या पदभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्जदारास अर्ज हा दि. १२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत करणे बंधनकारक असेल.