दरम्यान, याआधी २०१८ मधील जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सर्वोत्तम ७० पदके होती. भारताची आतापर्यंतची पदक कमाई पाहता शतक साजरे करणार का, अशी उत्सुकता क्रीडाविश्वात पाहायला मिळत आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत १६ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांसह ७४ पदके आहेत. दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने साडेचार दिवसांच्या कृतीसह १९ व्या आवृत्तीत हँगझोऊ येथे आतापर्यंतची सर्वोच्च पदकतालिका गाठली.
पण भारत पदकांची शंभरी गाठेल का?
१९ व्या आशियाई क्रीडास्पर्धेत भारताकडे स्क्वॉश दुहेरी स्पर्धेत दोन निश्चित पदके आहेत आणि बॉक्सिंगमध्ये आणखी दोन पदके आहेत, याचा अर्थ त्यांच्या पदकांची संख्या ७८ निश्चित आहे, त्यामुळे भारत पुढील काही दिवसात काय कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.