कंत्राटी कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी मानधन

31 Oct 2023 15:48:38

thane

ठाणे :
ठाणे महापालिकेचे कायमस्वरूपी अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला वेतन देण्यात येत असले तरी कंत्राटी कर्मचार्‍यांना हजेरीनुसार विलंबाने मानधन दिले जाते. यंदा नोव्हेंबर महिन्याच्या १० तारखेपासून दिवाळीचा सण सुरू होत आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांना त्यांचे वेतन सोमवार दि. ६ नोव्हेंबरपूर्वी देण्याचा निर्णय ठाणे पालिकेकडून घेण्यात आला आहे.

कंत्राटी कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी मानधन हाती येणार असल्यामुळे दिवाळीचा आनंद साजरा करता येणार आहे. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी या संदर्भात सर्व विभागप्रमुख, खातेप्रमुख, उपायुक्त, साहाय्यक आयुक्तांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालिकेच्या सर्व विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्‍यांना वेतन दि. ६ नोव्हेंबरपूर्वी मिळणार आहे.

Powered By Sangraha 9.0