कॅनेडियन गायक शुभकडून इंदिरा गांधींच्या हत्येचे समर्थन! व्हिडीओ व्हायरल
31 Oct 2023 14:38:25
मुंबई : कॅनेडियन पंजाबी गायक शुभनीत सिंह एका हुडीमुळे सध्या चर्चेत आला आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येचे चित्र असलेली हुडी त्याने आपल्या एका कार्यक्रमात दाखवली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शुभनीत सिंह हा एक रॅपर म्हणून प्रसिद्ध असून त्याला शुभ या नावाने ओळखले जाते. त्याने नुकतेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येचे चित्र असलेली हुडी आपल्या एका शोमध्ये दाखवली आहे. २९ ऑक्टोबर रोजी लंडनमध्ये त्याच्या लाईव्ह शोमध्ये त्याने हे कृत्य केले आहे.
मात्र, शुभ किंवा त्याच्या टीमकडून यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. शुभच्या या कृत्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका करण्यात येत आहे. दरम्यान, यापुर्वीही कथित खलिस्तानी संबंधांमुळे त्याचा भारत दौरा रद्द झाल्याने तो चर्चेत आला होता.