NHB Recruitment 2023 : विविध पदांकरिता भरती; पदवीधरांना नोकरीची संधी!

03 Oct 2023 16:30:18
National Housing Bank Recruitment 2023

मुंबई :
राष्ट्रीय आवास बँकेत विविध पदांकरिता भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात विविध पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राष्ट्रीय आवास बँकमधील विविध पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ही रिक्त पदे लेखी परीक्षा आणि मुलाखत या निवडपध्दतीद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. १८ ऑक्टोबर २०२३ असणार आहे.

राष्ट्रीय आवास बँकेतील जनरल मॅनेजर स्केल - VII, डेप्युटी जनरल मॅनेजर (CFO) स्केल - VI, सहाय्यक महाव्यवस्थापक स्केल-V (अर्थशास्त्रज्ञ), उपव्यवस्थापक, स्केल - II (MIS आणि अर्थशास्त्रज्ञ), सहाय्यक व्यवस्थापक स्केल-I (सामान्यवादी आणि राजभाषा), मुख्य अर्थशास्त्रज्ञ (करारावर), वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी या विविध पदांची भरती केली जाणार आहे.

भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


Powered By Sangraha 9.0