छत्रपती संभाजीनगर : नांदेड येथील शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ मृत्यू झाले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच घाटी रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये २ नवजात बालकांचाही समावेश आहे.
दरम्यान, यावर रुग्णालयाचे डीन डॉ. संजय राठोड यांनी आमच्याकडे औषधांचा तुटवडा नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. "ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे ते बाहेरुन उपचार घेऊन पैसे संपल्यावर शेवटच्या स्टेजला आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. सध्यातरी औषधांच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाला ही गोष्ट शक्य नाही," असे ते म्हणाले आहेत.
संजय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दररोज १० ते १२ मृत्यू होत असतात. त्यामुळे या रुग्णालयात महिन्याकाठी सरासरी ३०० रुग्ण दगावत असतात. या रुग्णांमध्ये बाहेरून रेफर केलेले व उशिरा दाखल केलेले रुग्ण अधिक असतात. त्यामुळे औषधांचा तुटवडा आणि डॉक्टरांच्या कमतरतेमुळे ए