भारतीय गोलंदाजीपुढं साहेबांचं लोटांगण; टीम इंडिया गुणतालिकेत अव्वलस्थानी

29 Oct 2023 21:45:34
England-vs-India-Wolrd-cup-2023-Match

नवी दिल्ली :
भारत विरुध्द इंग्लंड सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात भारताने इंग्लंडवर धावांनी विजय मिळविला. या सामन्यात भारताने अचूक गोलंदाजी करत इंग्लिश खेळाडूंना स्वस्तात माघारी धाडले. मोहम्मद शामीने २२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या तर बुमराह ३ विकेट्स तर कुलदीप यादवने २ विकेट्स घेत विजयास हातभार लावला.

दरम्यान, भारताने दिलेल्या २३० धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ केवळ १२९ धावाच करु शकला. इंग्लंडचे सर्व फलंदाज भारतीय माऱ्यापुढे सपशेल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. भारत आणि इंग्लंड यांच्यात लखनऊ येथे विश्वचषकातील सामना खेळविण्यात येत असून भारताने प्रथम फलंदाजी करत २३० धावांचे लक्ष्य इंग्लंडला दिले. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माने एकाकी झुंज देत १०१ चेंडूत ८७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताने पावरप्लेमध्ये ३५ धावा करत गिल (९) आणि विराट (०) यांच्यारुपाने मह्त्त्वपूर्ण विकेट्स गमावल्या. त्यानंतर रोहित शर्माने एकातर्फी लढा देत इंग्लिश गोलंदाजांवर अॅटॅक करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, सुर्यकुमार यादव(49) आणि के एल राहुल (39) धावा काढल्या. इंग्लिश गोलंदाज विलीने मह्त्त्वाच्या ३ विकेट्स घेत भारताला धावांचा डोंगर उभा करण्यापासून रोखलं. तर मध्यमगती गोलंदाज क्रिस वोक्स आणि फिरकीपटू आदिल रशीद यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. भारताने इंग्लंडला विजयासाठी २३० धावांचे आव्हान दिले असून गुणतालिकेत अव्वलस्थानी येण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागेल.
Powered By Sangraha 9.0