मुंबई : भगिनी निवेदिताचा आज जन्मदिन. या भगिनी निवेदिता कोण? तर भगिनी निवेदिता म्हणजे स्वामी विवेकानंदांची एक सहकारी.. शिष्य. 1895 मध्ये, लंडनच्या एका गजबजलेल्या रस्त्यावर भगिनी निवेदिता आणि स्वामी विवेकानंद समोरासमोर आले, आणि या एक छोट्याश्या घटनेने तिचे आयुष्य बदलले. ही एक अशी भेट होती जिने तीच सगळंच हिरावून घेतलं. अगदी नाव सुद्धा. निवेदिता हा नाव तिला भारतात आल्यानंतर आपल्या गुरूकडून प्राप्त झाले. 1898 मध्ये तिने कलकत्त्यात प्रवेश केला. तो भारतासाठी आपले जीवन वाहून घेणे या एका दुर्दम्य इच्छेसाठीच! स्वामी विवेकानंदांसोबत राहून तिने ब्रह्मचर्याचे व्रत स्वीकारले.
स्वामीजींच्या उदात्त आकांक्षा त्यांच्या स्वतःच्या आध्यात्मिक शोधाच्या मर्यादेपलीकडे विस्तारल्या होत्या. आरोग्यसेवा आणि शिक्षण या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांनी भगिनी निवेदिता यांच्यावर स्त्रियांची जबादारी सोपवली. याच गुरूने दिलेल्या कार्यासाठी तिने आपले संपूर्ण आयुष्य या उदात्त कारणांसाठी समर्पित केले, अशा प्रकारे ती भक्ती आणि सेवेचे प्रतीक बनली.
स्थानिक लोकांना भगिनी निवेदिताची ओळख करून देताना स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणात सांगितले - "इंग्लंडने आम्हाला मिस मार्गारेट नोबल निमित्ताने आणखी एक भेट पाठवली आहे."