मुंबई : 'एमएमआरडीए'ने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील टर्मिनल जंक्शनजवळ स्टील गर्डर्सचे लाँचिंग यशस्वीरित्या पूर्ण केले, सुमारे ७४ मीटर चे एकूण आठ स्टील आणि पीएससी गर्डर्स स्पॅनची उभारणी करण्यात आली आहे.हे गर्डर्स जमिनीवरून कोणताही आधार न घेता उभारण्यात आले आहेत. एमएमआरडीएने हे जड स्टील गर्डर्स लाँच करण्यासाठी इनव्हर्टेड टी व्यवस्थेचा वापर करून नवीन डिझाइन आणि तंत्र लागू केले आहे. डिझाईन नुसार उड्डाणपुलाची रचना कमी लांबी आणि कमीत कमी उंचीसह केली गेल्याने खर्चात लक्षणीय घट झाली आहे.
एमएमआरडीएने हाती घेतलेल्या या प्रकल्पातील उड्डाणपुलाची लांबी ६१५ मीटर असून तो ८ मीटर रुंद असणार आहे. त्यामुळे, हा पूल पूर्ण झाल्यावर, हा नवीन उड्डाणपूल प्रवाशांना विमानतळावर आणि तेथून विहित ठिकाणी प्रवास करताना काही प्रमाणात आवश्यक दिलासा मिळउन देणारा ठरणार आहे.
फ्लायओव्हरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे टर्मिनल १ जंक्शनवरील पीक-अवर मध्ये सुमारे १०००० पेक्षा जास्त गाड्या असल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो असतो. त्यामुळे एमएमआरडीए इंडियन रोड काँग्रेसच्या मानकांचे पालन करून या प्रकल्पाचे बांधकाम करत आहे. WEH वरील वाहतूक कोंडी कमी करणे हा फ्लायओव्हरचा एक महत्त्वाचा फायदा आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ ते वांद्रे पर्यंतच्या वाहतुकीत सुधारणा होणार आहे.
'एमएमआरडीए'चे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले "मुंबई महानगर प्रदेशाचा प्रवास उज्वल भविष्याकडे नेऊन नागरिकांना वाहतुकीवर सकारात्मक परिणाम होणार आहे. विशेषत: हा उड्डाणपूल देशांतर्गत उड्डाणांच्या प्रवाशांना, तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण त्यांचा विमानतळावर जाण्याचा किंवा येण्याचा प्रवासातील बराच ताण कमी होणार आहे. त्यामुळे, या नवीन उड्डाणपुलामुळे मुख्यत: गर्दीच्या वेळेत विमानतळाकडे जाण्याबाबत प्रवाशांची चिंता संपुष्टात येईल.”