चेन्नई : "रामाचा जन्म ही पौराणिक कथा आहे. ही रामायणाची कथा आहे. हे साहित्य आहे. त्यांना इतिहासाची जागा पौराणिक कथांना द्यायची आहे." असे वादग्रस्त आणि भगवान रामाचा अपमान करणारे विधान डीएमके नेते टीकेएस एलांगोवन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे.
डीएमकेच्या नेत्यांनी याआधी पण अशाच प्रकारची हिंदू धर्माचा अपमान करणारी विधान केली आहेत. डीएमकेचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सुद्धा सनातन धर्माची तुलना डेंगू आणि मलेरियाशी केली होती. अशाच प्रकारे ए.राजा यांनी सुद्धा सनातन धर्माचा अपमान केला होता.
टीकेएस एलांगोवन यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपवर इतिहास नष्ट करण्याचा आरोप केला. ते म्हणाले की, "मी काय सांगू? ते इतिहास नष्ट करत आहेत आणि त्याच्या जागी पौराणिक कथा आणत आहेत. कोणत्याही देशाला त्याच्या इतिहासाचा अभिमान असायला हवा."