मुंबई (विशेष प्रतिनिधी): नॅचरलिस्ट फाऊंडेशनच्या नॅचरलिस्ट एक्सप्लोरेर्स या पर्यावरणपूरक सहलींचे अयोजन करणाऱ्या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाचे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनावरण करण्यात आले. अंधेरी येथे मंगळवार दि. २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४ वाजता या संकेतस्थाळाचे अनावरण संस्थापक सचिन राणे आणि अनुराग कारेकर यांच्या हस्ते केले गेले.
गेल्या वर्षभराहून अधिक काळ पर्यावरणपूरक निसर्ग सहलींचे आयोजन करणाऱ्या या संस्थेला पर्यटकांचा आणि पर्यावरण अभ्यासकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळेच अधिकाधिक लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचण्यासाठी हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर भारतभरातील निसर्ग आणि पर्यावरणाच्या जवळ नेणाऱ्या स्थळांचा समावेश असून यामध्ये विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. यामार्फत पर्यावरणाचा अभ्यास आणि अनुभव असणारे नॅचरलिस्ट पर्यटकांना मार्गदर्शक म्हणून ही घेता येणार असून कमी किमतीत या निसर्ग पर्यटनाचा आनंद लूटता येणार आहे.
नेचर ट्रेल्स, वाइल्डलाईफ फोटोग्राफी, पर्यावरण निरीक्षण, पक्षी निरीक्षण, हेरिटेज वॉक्स अशा बहुरंगी उपक्रमांचा यात समावेश असून निसर्ग प्रेमींसाठी हे पर्यटन म्हणजे जैवविविधता आणि निसर्ग अभ्यासण्यासाठीची सुवर्णसंधी असणार आहे.