भोपाळ : माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते एका मागासवर्गीय महिलेला आयटम म्हणताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
हा व्हिडिओ जुना आहे. पण व्हायरल झाल्यानंतर कमलनाथ यांच्या दलितविरोधी मानसिकतेवर टीका होत आहे. कमलनाथ या व्हिडिओत फक्त मागासवर्गीय महिलेचाच अपमान करत नाहीत तर या व्हिडिओत ते देशातील लहान राज्यांचा पण अपमान करताना दिसत आहेत.
ते या व्हिडिओत म्हणाले होते की, मध्य प्रदेश सारख्या राज्याची तुलना मिझोराम आणि त्रिपुरासारख्या क्षुल्लक राज्यांशी होऊ शकत नाही. असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर सुद्धा टीका करण्यात आली. कमलनाथ यांचा हा व्हिडिओ भाजप नेत्यांनी सुद्धा शेयर केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी हा व्हिडिओ शेयर करत लिहिले आहे की, "ईशान्येतील छोट्या राज्यांना तुच्छ लेखणाऱ्यांनी आता दलित बहिणीवर अशोभनीय टिप्पणी केली आहे. "कमलनाथ यांनी काँग्रेसचे खरे चारित्र्य आणि दुष्ट मानसिकता उघड केली आहे."