लंडन : युनायटेड किंगडम (यूके) पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोमवारी (२३ ऑक्टोबर २०२३) ब्रिटनच्या रस्त्यावर 'जिहादची घोषणा' करणाऱ्यांना इशारा दिला. ते म्हणाले, "आम्ही आमच्या देशात सेमेटिझम(ज्यू विरोधी भावना) कधीही सहन करणार नाही." हमासने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १४०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
ऋषी सुनक पुढे बोलताना म्हणाले की, "जिहादची घोषणा केवळ ज्यू समुदायासाठीच नाही, तर आपल्या लोकशाही मूल्यांनाही धोका आहे." शनिवारी मध्य लंडनमध्ये पॅलेस्टाईन समर्थक रॅलीमध्ये सुमारे एक लाख लोक सहभागी झाले होते. यावेळी हे लोक जिहादच्या घोषणा देताना ऐकू आले.
लंडन पोलिसांवर जिहादच्या समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या लोकांवर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप होता. यावर पोलीस अधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडताना कायद्यात बदल करण्याबाबत बोलले. दरम्यान, पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये जिहादच्या घोषणा देणाऱ्यांना अटक न केल्याबद्दल मेट्रोपॉलिटन पोलिस प्रमुख सर मार्क रॉली यांच्यावर टीका करण्यात आली.