इस्त्रायल-हमास युद्ध: गाझामधील मृतांचा आकडा ५ हजारांच्या वर
24 Oct 2023 17:02:00
मुंबई : इस्त्रायल आणि हमासमध्ये अजूनही युद्घ सुरुच आहे. इस्त्रायलकडून गाझावर हल्ले सुरुच आहेत. या युद्धामध्ये हजारों निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. दरम्यान, आतापर्यंत गाझामधील मृतांची संख्या ५ हजारांच्या वर गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत गाझामधील मृतांचा आकडा ५०८७ वर पोहोचला आहे. यात २०५५ मुले, १११९ महिला आणि २१७ वृद्धांचा समावेश आहे. तसेच १५ हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्त्रायलनेही गाझा पट्टीवर हल्ले सुरु केले आहेत. तसेच इस्त्रायलने गाझा पट्टीत इंधन, पाण्यासह इतर मानवतावादी साहित्यांवर बंदी आणली आहे. त्यामुळे गाझा पट्टीतील नागरिकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे.
यातच आता गाझातील मृतांचा आकडा ५ हजारांच्या वर जाऊन पोहोचला आहे. दोन्ही बाजूंकडून युद्ध संपवण्याचे कोणतेच चिन्ह दिसत नाही. दरम्यान, भारताने गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांना मदत पाठवली आहे. यामध्ये विविध अत्यावश्यक सामग्री पाठवण्यात आली आहे.