'शिवाजी विद्यापीठ' अंतर्गत 'या' पदासाठी भरती सुरू

24 Oct 2023 18:47:20
Shivaji University Recruitment 2023

मुंबई :
'शिवाजी विद्यापीठ' कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. शिवाजी विद्यापीठांतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली असून पोस्ट डॉक्टरेट फेलो पदांच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

'शिवाजी विद्यापीठ' मधील रिक्त पदाकरिता अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि. ०६ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. तसेच, अर्जदारांनी भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Powered By Sangraha 9.0