दसऱ्याला सोने चांदी महागले कालच्या कमी भावाच्या तुलनेत भाववाढ

24 Oct 2023 15:49:52

Gold
 
 
दसऱ्याला सोने चांदी महागले कालच्या कमी भावाच्या तुलनेत भाववाढ
 
मुंबई: वैश्विक युद्ध, मंदी व अर्थव्यवस्थेतील अडचणीच्या कालावधीत देखील काल रूपयाचा भाव वधारला असल्याने काल सोने चांदीच्या किंमतीत कपात झाली असली तरी दसरा सणाच्या निमित्ताने वाढलेली सोन्या चांदीची मागणी याचा एकत्रित परिणाम म्हणून आज पुन्हा एकदा भाव वाढले आहेत. MCX मध्ये मेटलची देखील भाववाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
काल प्रति १० ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत ही ५६३५० रूपये इतकी होती. आज मात्र त्यात वाढ होऊन रू ५६५०० प्रति ग्राम झाली आहे. एकूण १०० ग्राम सोन्यात कमाल २००० रूपयांपर्यंत फरक पोहोचला आहे.२४ कॅरेट सोन्याच्या भावात देखील प्रति ग्राम सुमारे १५० ते २०० रूपयांचा फरक झालेला दिसला. काल ६१४५० वरून आज ६१६९० रूपये प्रति ग्राम इतका झाला.
 
Powered By Sangraha 9.0