पर्यावरणातील नवदुर्गा : आम्रपाली पडघन

23 Oct 2023 13:21:38
Amprapali Padghan

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...

गेल्या सहा वर्षांपासून वनांचे रक्षण करणार्‍या आणि सध्या बोर टायगर रिझर्व्हमध्ये कार्यरत असणार्‍या महिला वनरक्षक आम्रपाली पडघन. यापूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात चार वर्ष काम करणार्‍या आणि आता दोन वर्षांपासून बोर व्याघ्र क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आम्रपाली वनरक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

जंगल क्षेत्रामध्ये पायी गस्त घालत शिकार, अवैध वृक्षतोड, वन्यप्राण्यांची तस्करी अशा अवैधपणे होणार्‍या गोष्टींना आळा घालण्यासाठी सतर्क असलेल्या वनविभागाच्या एक उत्तम महिला वनरक्षक. वनरक्षकाच्या भूमिकेत असल्या तरी त्या ‘स्नेक रेस्क्यू’ही करतात. विषारी आणि बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या अनेक सापांचे त्यांनी रेस्क्यूही केले आहे. याबद्दल त्या स्थानिक समाजामध्ये जनजागृतीही करतात. त्याचबरोबर वन्यजीव छायाचित्रणाची आवड असलेल्या आम्रपाली यांनी पेंचमधील जवळजवळ ८५ प्रजातींची नोंदही केली आहे. त्यांच्या या कामासाठी २०२१ मध्ये ‘वनदुर्गा पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

संकलन आणि शब्दांकन : अंवती भोयर , समृध्दी ढमाले


Powered By Sangraha 9.0