आध्‍यात्मिक पर्यटनासाठी समर्पित प्‍लॅटफॉर्म ‘ईझीदर्शन’ लाँच

23 Oct 2023 12:57:00
 
Easemytrip
 
 
 
 
 
 

 

आध्‍यात्मिक पर्यटनासाठी समर्पित प्‍लॅटफॉर्म ‘ईझीदर्शन’ लाँच

मुंबई: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने त्‍यांची नवीन ऑफरिंग ईझीदर्शन लाँच केले आहे. हे समर्पित व्‍यासपीठ भारतभरात सर्वसमावेशक तीर्थक्षेत्र पॅकेजेस् प्रदान करत पर्यटकांच्‍या आध्‍यात्मिक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहे.
 
ईझीदर्शन अनेक विशेषरित्‍या डिझाइन करण्‍यात आलेल्‍या दैवी पॅकेजेसची श्रेणी देते, ज्‍यामधून भक्‍तांना त्‍यांच्‍या आध्‍यात्मिक प्रवासावर लक्ष केंद्रित करता येऊ शकते आणि लॉजिस्टिक्‍स व नियोजनासंदर्भात कोणताही त्रास होणार नाही. हे व्‍यासपीठ विविध पॅकेजेस् देते आणि या पॅकेजमध्‍ये निसर्गरम्‍य हिमालयातील तीर्थक्षेत्रांपासून दक्षिणेकडील शांतमय मंदिरांपर्यंत देशभरातील आदरणीय तीर्थक्षेत्रांच्या विस्तृत स्पेक्ट्रमचा समावेश आहे.तसेच ग्राहकांना ऑफर केलेल्या पॅकेजमध्ये वाहतूक,निवास, मार्गदर्शित टूर आणि विशेष पूजा यांचा समावेश आहे.सुरक्षितता व स्वच्छता उपायांना प्राधान्य देऊन प्‍लॅटफॉर्म पर्यटकांना सोयीस्कर, सुरक्षित आणि शांत आध्यात्मिक टूरचा आनंद मिळण्‍याची खात्री देईल.
 
इझमायट्रिपचे सीईओ व सह-संस्‍थापक श्री. निशांत पिट्टी म्‍हणाले, "भारत अध्यात्माची भूमी म्हणून ओळखला जातो, जेथे सुंदर कोरीव मंदिरे, शांत गुरुद्वारा, भव्य चर्च व भव्य मशिदी आहेत. म्हणूनच भारतीयांच्या मनात आध्यात्मिक पर्यटनाला विशेष स्थान आहे आणि लोक आता पूर्वीपेक्षा अधिक उत्साहासह धार्मिक व आध्यात्मिक स्थळांना भेट देण्यास उत्सुक आहेत.आम्हाला माहित होते की, प्राधान्‍य न देण्‍यात आलेले क्षेत्र असून त्‍यामध्‍ये विकासाची मोठी क्षमता आहे. यामधून आम्‍हाला ईझीदर्शन लाँच करण्‍यास प्रेरणा मिळाली. या व्‍यासपीठाच्‍या माध्‍यमातून भक्ती व सोयीसुविधा यांच्यातील तफावत दूर करण्‍याचा आणि आमच्या ग्राहकांना त्‍यांच्‍या आध्यात्मिक आकांक्षेशी जुळणारे अखंड, सोयीस्कर व सुरक्षित तीर्थयात्रा अनुभव देण्‍याचा आमचा मनसुबा आहे."
 
आध्‍यात्मिक पर्यटन ही भारतीय प्रवास व पर्यटन उद्योगामधील प्रमुख बाजारपेठ आहे. या अद्वितीय विभागामध्‍ये प्रवेश करणे हे ब्रॅण्‍डचे धोरणात्‍मक पाऊल आहे, ज्‍यामागे ग्राहकांचा तीर्थक्षेत्रांना भेट देण्‍याचा अनुभव सुलभ व संपन्‍न करण्‍याचा एकमेव उद्देश आहे.
 
Powered By Sangraha 9.0