विहिंप, बजरंग दल व हिंदू युवा प्रतिष्ठानच्यावतीने रावण दहन

22 Oct 2023 16:33:41
ravan dahan

ठाणे :
विश्व हिंदु परिषद, बजरंग दल व हिंदु युवा प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ठाण्यातील कोलबाड, जागमाता मैदान येथे विजयादशमी उत्सव निमित्त भव्य दिव्य रावण दहनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.अन्याय,अहंकारी, पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते. विजयादशमीच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. त्यानुसार, हिंदू धर्मीय सर्वत्र रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात. हिंदु युवा प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवारी जागमाता मैदान, कोलबाड रोड खोपट ठाणे येथे आयोजित केलेल्या रावण दहनाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी आवर्जुन उपस्थित राहावे.असे आवाहन हिंदू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक मेढेकर यांनी केले आहे.

Powered By Sangraha 9.0