सायबेरियातुन ‘ब्लॅक टेल्ड गॉडविट’ पक्ष्यांचे थवे मुंबईत

21 Oct 2023 17:04:39



black tailed godwit


मुंबई (प्रतिनिधी): सायबेरिया आणि रशियातुन हजारोंच्या संख्येने ब्लॅक टेल्ड गॉडविट या पक्ष्यांचे थवे मुंबईत दाखल झाले आहेत. सध्या ते मुंबईतील ठाणे खाडी, खारघर, भांडूप पंपिंग स्टेशन, टि.एस. चाणक्य अशा ठिकाणी दिसत आहेत.
दरवर्षी, जूलै ते सप्टेंबर आणि मार्च ते मे या कालावधीत हे पक्षी स्थलांतर करतात. इतर पक्ष्यांसारखे हिवाळ्यातील कठोर तापमानाच्या स्थिती आणि अन्नाचा तुटवडा या समस्यांपासुन बचाव करण्यासाठी हे पक्षी दरवर्षी स्थलांतर करतात. हा पक्षी धोकादायक वर्गात येत असुन, मध्य आशियातुन दरवर्षी १० हजार किलोमिटरचा प्रवास करत स्थलांतर करतात. हे पक्षी युरोपातील आईसलँडपासुन ते रशियाचा पुर्वेकडील भागात प्रजनन करतात. तर, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये हिवाळ्यात स्थलांतर करतात.
“गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०२२ मध्ये ब्लॅक टेल्ड गॉडवीटचा २० हजार पक्ष्यांचा सर्वांत मोठा थवा नोंदवला गेला होता. यंदा १० हजारांपर्यंतचा सर्वांत मोठा थवा आत्तापर्यंत नोंदवला गेला आहे.”

- मृगांक प्रभू
पक्षी अभ्यासक 


Powered By Sangraha 9.0