रत्नागिरी : "भारतीय संस्कृतीने कधीही कुणावर आक्रमणे केली नाहीत उलट ज्या शरणार्थींना आश्रयाची गरज होती त्यांची मदत केली. पारसी, ज्यू किंवा अन्य कुठल्याही समाजाला त्यांच्या देशातून हुसकावण्यात आले त्यांना भारतीय संस्कृतीने आपल्यात सामावून घेतले. हा भारतीय संस्कृतीचा आणि हिंदू धर्माचा मोठेपणा आहे. शिवाय आपल्या संतपरंपरेने दुबळ्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना अध्यात्मिक शक्ती देण्याचे काम केले. म्हणूनच आपली संस्कृती हजारो वर्षे टीकू शकली.", असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
रत्नागिरीतील श्री क्षेत्र नाणीजधाम येथे जगदगुरु रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर प.पू.जगतगुरु स्वामी श्री नरेंद्रचार्य महाराज, प.पू. उत्तराधिकारी श्री कैलासनाथ महाराज, पालकमंत्री उदय सामंत, आमदार अभिमन्यू पवार, किरण सामंत, उल्हास घोसाळकर आदी मान्यवर आणि महानुभावांसह लाखो स्वामीभक्त उपस्थित होते. या प्रसंगी गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिकांचे लोकार्पणही करण्यात आले.
फडणवीस म्हणाले, "भारताने कधी कुणावर आक्रमण केले नाही हा इतिहास आहे. ज्या ज्या लोकांना त्यांच्या देशातून बाहेर काढण्यात आले त्यांना भारताने आश्रय दिला. इस्त्रायलमध्ये जेव्हा ज्यूंना मी भेटलो तेव्हा ते आपला इतिहास सांगतात. आम्हाला आमच्या देशातून बाहेर काढण्यात आहे. तेव्हा त्यांना सामावून घेणारा भारत देशच होता. इथली हिंदू संस्कृती होती. पारसी, ज्यू किंवा अन्य कुठल्याही सामाजाला त्या त्या देशांनी बहिष्कृत केलं तेव्हा भारताने त्यांना आश्रय दिला. हे भारताचे आणि हिंदू धर्माचे मोठेपण आहे. त्यामुळेच आपली संस्कृती हजारो वर्षे टीकू शकली. आज देशात जिथे जिथे उत्खनन सुरू आहे तिथून बाहेर पडणाऱ्या संस्कृतीच्या अवशेषांतून हिंदू संस्कृतीचे विकसित स्वरुप पुढे येत आहे. हे आता जगही मान्य करत आहे."
"ही संस्कृती आपण टीकवू शकलो कारण आपल्या देशाला लाभलेली मोठी संत परंपरा आहे. राजा कोण आहे? फायदा-तोटा काय? माझा परिवार वाढेल की नाही? हे विचार त्यागून संत परंपरा चालत राहिली. त्यांनी केवळ समाजाचा विचार केला. समाज हा सश्रद्ध राहिला पाहिजे, समाज सश्रद्ध राहिला तर एकमेकाचा विचार करेल अन्यथा तो आत्मकेंद्रित झाला तर स्वतःचा विचार करेल आणि तो संपेल. संतांनी आपल्याला समाजासाठी जगायला शिकवले म्हणून आपली संस्कृती आणि समाज व्यवस्था जिवंत आहे. महाराज ज्याचा उल्लेख वारंवार करतात स्वतःही जगायचं आहे आणि दुसऱ्यालाही जगवायचे आहे ते यासाठीच.", असे म्हणत त्यांनी महाराजांच्या कार्याची जाणीव करुन दिली.
"पाश्चिमात्य संस्कृती म्हणजे जो शक्तीशाली आहे तो टीकेल आणि जो दुर्बल आहे तो संपेल. मात्र, भारतीय संस्कृती संतांनी दुर्बलांनाही जगवण्याचा विचार आपल्याला दिला. किंबुहना संत सबळांपेक्षा दुर्बलांच्या पाठीशीच कायम उभे राहतात. त्यांना अध्यात्मिक शक्ती देऊन समाजामध्ये उभे करण्याचे काम करतात. हा आपल्या संस्कृतीतील फरक आहे. भारतात विविध धर्माचे लोक राहतात. ज्यावेळी परकीय आक्रांती तेव्हा हा त्यांची धर्मातरणे झाली. त्यापूर्वी ते कधीतरी हिंदूच होते. हिंदू धर्मात धर्मामध्ये धर्मपरिवर्तन आम्हाला मान्य नाही. आम्ही धर्मपरिवर्तन मानत नाही. तर ज्या लोकांना विशिष्ट परिस्थितीमध्ये हिंदू धर्म सोडले अशा लोकांचं शुद्धीकरण करून आपल्या धर्मात आपण पुन्हा परत घेतो, हे घरवापसीचे कार्य महाराजांच्या माध्यमातून चालते.", असेही ते म्हणाले.
महाराजांच्या आज्ञेनुसार, महासंकल्पाच्या अंतर्गत रक्तदानासह ५४ हजार कुटूंबांनी देहदानाचा संकल्प घेतला. त्यामुळे देहदानासह अवयवदानाची एक चळवळ महाराजांनी महाराष्ट्रभर उभी करावी, अशी विनंतीही फडणवीसांनी केली. याशिवाय ज्या-ज्यावेळी अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडॉर उभी करण्याची गरज जेव्हा भासेल तेव्हा कमीत कमी वेळेत हा उभा करुन देण्याचा प्रयत्न करुन, असे आश्वासनही त्यांनी दिले.
इस्त्राइल आणि हमास युद्ध हा हिंदूंसाठी धडा!
हिंदु खतरें में हैं! एकजुटीने रहा! इस्त्राइल आणि हमास युद्धातुन बोध घेणाऱ्यांनी घेतला. पण जे काही नाही शिकले ते संपणार आहेत. म्हणून माझी हिंदु धर्म खतरें में हैं!, अशी घोषणा स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी यावेळी केली. यहुदींचा (ज्यु) देश इस्त्राइल आहे आणि हिंदु त्याच्यापेक्षा काही वेगळे नाहीत. आज ते जात्यात आहेत, आपण सुपात आहोत. कधीतरी आपल्यावरसुद्धा अशी दुर्दैवाने वेळ आली तर ज्यूंची स्थिती जशी केवीलवाणी झाली तशी होईल. मात्र, त्यांची देशाप्रती जी निष्ठा आहे, दुर्दैवाने तो प्रकार आपल्या देशात पाहायला मिळत नाही.", अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.