हिंदू धर्म आणि संस्कृतीला मोठा धोका

21 Oct 2023 13:20:07
yogita salvi

कल्याण :
“धर्म आणि संस्कृतीला सर्वात जास्त धोका हा जातीनिहाय जनगणना, ‘लव्ह जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’ यांचा आहे. पण, ज्या देशात धर्म आणि संस्कृती टिकून आहे, तिथे या कोणत्याही समस्या नसतात,” असे मत दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी व्यक्त केले. उज्ज्वला मंडळ, कल्याणतर्फे शारदोत्सवअंतर्गत ‘धर्म, संस्कृती आणि समस्या’ या विषयावर बुधवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी व्याख्यान आयोजित केले होते, यावेळी साळवी बोलत होत्या. अभिनव विद्यामंदिर, कल्याण येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी निलेश लिमये, डॉ. रत्नाकर फाटक, दीपाली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

योगिता साळवी म्हणाल्या की, “आपल्या इतिहासाचे विद्रुपीकरण केले जाते. आपल्या महापुरुषांविषयी चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात. इतिहास मिटविण्यासाठी काहीतरी पेरले जाते. हे सर्व हिंदूंनी आपला धर्म आणि त्यांच्या खुणा विसराव्यात, यासाठी केले जात आहे. हा आपल्या धर्म आणि संस्कृतीला धोका आहे. आता जातीनिहाय जणगणना करा, असे बोलले जात आहे. पण, जातीनिहाय जनगणना करताना त्यांचा धोका धर्म आणि संस्कृतीला आहे.

आपल्या देशाचे नुकसान मोठ्या प्रमाणात संविधानाने दिलेल्या आरक्षणामुळे झाले आहे. जे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांना लाभ मिळाला पाहिजे. पण, जातीनिहाय जनगणना फक्त हिंदू धर्मातील लोकांची व्हावी, अशी मागणी करणारे समाजाला धोकादायक आहेत. हिंदू धर्मियांची विभागणी करण्याचा त्यांचा कट आहे. हिंदूच्या राजकीय फायद्याच्या दृष्टीने मतांची फोडाफोडी करायची आहे. कारण, हिंदू राजकीयदृष्ट्या सजग झाला आहे. येत्या काळात जातीनिहाय जनगणनेची मागणी जोर धरणार आहे. ‘लव्ह जिहाद’ यांचाही हिंदू धर्म, संस्कृतीला धोका आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “बॉम्बस्फोट आणि आत्मघातकी हल्ल्यांपेक्षाही घातक ‘लव्ह जिहाद’ आहे. कारण, बॉम्बस्फोटाचा आवाज येतो. पण, ‘लव्ह जिहाद’ हा त्यापेक्षा घातक आहे. त्याचा आवाज होत नाही. छोट्या-छोट्या गावात पाच ते सहा ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे आहेत. ‘लॅण्ड जिहाद’मुळेही धर्म व संस्कृतीला धोका निर्माण होऊ शकतो. कल्याण मलंगगड हे त्यांचेच एक उदाहरण देता येईल. आपला इतिहास काय आहे, हे मुलांना समजला पाहिजे,” असा सल्ला साळवी यांनी दिला.
Powered By Sangraha 9.0