'जय श्री राम'ला विरोध करणाऱ्या महाविद्यालयाची वेबसाईट हॅक! प्राध्यापिकेची शूर्पणखेशी तुलना

21 Oct 2023 13:10:56
ABES college website hacked after student was thrown off stage for chanting Jai Shree Ram

लखनौ : गाझियाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालय ABSE मध्ये जय श्री रामचा नारा लावल्याबद्दल एका विद्यार्थ्याला स्टेजवरून हटवण्यात आले होते. त्यानंतर आता ABSE महाविद्यालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. वेबसाईटवर मोठ्या अक्षरात जय श्री राम लिहिले आहे. तसेच घोषणाबाजीला विरोध करणाऱ्या प्राध्यापिका ममता गौतम यांचा फोटो एडिट करत त्यात त्यांचे नाक शूर्पणखेसारखे कापण्यात आले आहे. ही घटना वादाच्या एका दिवसानंतर म्हणजेच दि.२१ ऑक्टोबर २०२३ रोजी घडली.

ABSE महाविद्यालयाची वेबसाइट https://abes.ac.in/ ही आहे. हॅकरने वेबसाइटवर इंग्रजीत मोठ्या अक्षरात 'जय श्री राम' लिहिले आहे. याशिवाय हिंदीत जय श्री राम सोबत 'श्री रामाच्या नावाने फक्त भूत चिडतात' असे लिहिले आहे.होमपेज स्क्रीनच्या एका कोपर्‍यात प्रभू रामाचे चित्र आहे तर दुसऱ्या कोपऱ्यात महिला प्राध्यापिका ममता गौतम यांचे संपादित चित्र आहे. संपादित फोटोमध्ये ममता गौतम शूर्पणखाच्या रुपात दाखवण्यात आली आहे. चित्रात ममता गौतमचे नाकही कापण्यात आले आहे.
 
हॅक झालेल्या वेबसाईटवर भगवान रामाचे चित्र अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की ते शूर्पणखाच्या वेशात सहयोगी प्राध्यापक ममता गौतम यांच्यावर बाण सोडताना दिसत आहेत. ममता गौतमचा पोशाखही रामायण मालिकेतील शूर्पणखेसारखा बनवण्यात आला आहे.बालाचे ट्विट म्हणजेच X हँडल @erbmjha देखील चित्राच्या मध्यभागी दिसत आहे. या ट्विटमध्ये त्या व्हिडिओचा उल्लेख आहे ज्यात ममता गौतमने जय श्री रामचा नारा देणाऱ्या विद्यार्थ्याचा अपमान केला होता आणि त्याला स्टेजवरून हटवले होते. अद्याप या प्रकरणी ABSE कॉलेजकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी गाझियाबादच्या ABSE कॉलेजमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान एका विद्यार्थ्याने मंचावरून जय श्री राम म्हटले होते. यानंतर तेथे उपस्थित सहयोगी प्राध्यापिका ममता गौतम यांनी विद्यार्थ्याला शिवीगाळ करत मंचावरून खाली उतरवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच हिंदू संघटनांनी गदारोळ सुरू केला. या गदारोळानंतर प्रोफेसर ममता यांनी आपल्यावर टिप्पणी करणाऱ्यांवर न्यायालयीन कारवाईची धमकी दिली होती. मात्र, कॉलेज व्यवस्थापन ममता गौतमच्या कृत्याची चौकशी करत आहे.
 
Powered By Sangraha 9.0