मुंबईतील हवामान स्थिती जैसे थे...

    20-Oct-2023
Total Views |



mumbai air pollution


मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील वाढलेल्या हवा प्रदुषणाचा सर्वांनाच त्रास सहन करावा लागत असुन श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना याचा अधिक त्रास होत असलेला पहायला मिळत आहे. दिल्लीपेक्षा ही मुंबईची हवा दुषित झाल्याचे कळले असुन मुंबईची हवा सध्या धोकादायक पातकळीमध्ये आहे.


मुंबईच्या वायू प्रदूषणाचा निर्देशांक १४० वर असल्याचे सफर या संकेतस्थळावरून दिसत आहे. धोकादायक पातळीमध्ये हा निर्देशांक असुन श्वसनाचे विकार असणाऱ्यांना याचा त्रास होणार आहे. बुधवार दि. १८ ऑक्टोबर रोजी हा निर्देशांक १३० वर होता. मंगळवार दि. १७ ऑक्टोबर रोजी नवी मुंबईचा निर्देशांक खालावलेला होता. मुंबईच्या निर्देशांकात आता सुधार झाला असला तरी अद्याप तो मॉडरेट याच वर्गात दर्शवत आहे.

घटलेल्या हवेच्या दर्जाकडे लक्ष देऊन मुंबईकरांना काळजी घेण्याची आवाहन करण्यात आले आहे. ‘सफर’च्या संकेतस्थळावर करण्यात आली आहे. सफर संस्थेच्या तज्ञांकडुन श्वसनाचा, ह्रदयाचा किंवा फुप्फुसांचा त्रास असलेल्या रुग्णांना विशेष काळजी घेण्यासाठी आवाहन केले गेले आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.